सामुहिक वनहक्क आणि पेसा कायद्याचे मुल्यांकन

टीर फाउंडेशनच्या पथकाने केला दौरा यवतमाळ, दि 14 जून, (जिमाका) :- राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, भारत सरकार नवी दिल्ली अंतर्गत सामुहिक वनहक्क आणि पेसा कायद्याचे मुल्यांकन करण्याकरीता टीर फाउंडेशन, नाशिक यांच्या पथकाने यवतमाळ जिल्ह्याचा 6 ते 8 जून 2022 या तीन दिवसाचा दौरा केला. पथकाने जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा केळापुरचे उपविभागीय अधिकारी विवेक जॉनसन तसेच जिल्हा स्तरीय वनहक्क समीती सदस्य तथा उपवनसंरक्षक आनंद रेड्डी येल्लु, किरण जगताप, अशोक सोनकुसरे, सदस्य सचिव तथा उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. अहिर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अर्जून गुडधे व गट विकास अधिकारी यांचे समवेत वनहक्क कायदा व पेसा कायद्याविषयी चर्चा केली. याप्रसंगी अन्वेक्षक आयुष पटेल, व योगेश अडकीने उपस्थित होते. समितीने घाटंजी तालुक्यातील कोपरा वन, खडकी, केळापुर तालुक्यातील वडवाट व झरी जामणी येथील शिराढोकी पोड व मांडवा या पेसा व सामुहिक वनहक्क प्राप्त गावांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान सामुहिक वनहक्क दावा टाकतांना कोणत्या प्रकारची प्रक्रीया ग्रामसभेकडुन राबविण्यात आली, दावा किती क्षेत्रावर टाकण्यात आला, प्रत्यक्षात किती क्षेत्र मंजुर झाले, मान्य झालेल्या सामुहिक वनहक्क क्षेत्राचे व्यवस्थापन आराखडे तयार करण्याकारीता सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा कशा प्रकारे नियोजन करत आहे याबाबत तसेच गौण वनउपज अंतर्गत तेंदुपत्ता संकलनाबाबत माहिती घेतली. त्याच प्रकारे पेसा कायदा विषयी पथकाने माहिती घेतांना ग्रामकोष समिती गठीत केली आहे का, ग्रामकोष समितीमध्ये कोण कोण असतात, दर तिन महिन्यात ग्रामसेवकाकडुन ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येते का, पेसा अंतर्गत पाच टक्के अबंध निधीचे नियोजन आणि जमा खर्च ग्रामसभेत सांगीतला जातो का, निधी खर्च करताना ब आणि ड म्हणजेच वनहक्क आणि त्याच्या व्यवस्थापनावर खर्च केला जातो का, आदी विषयाबाबत विचारणा करून चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अबंध निधीचे दस्तऐवज तपासणी करण्यात आली. दौऱ्याचे नियोजन व व्यवस्थापन तहसिलदार भाग्यश्री देशमुख यांनी केले. पथकासोबत क्षेत्रिय भेटी दरम्यान सहायक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, गटविकास अधिकारी श्री. मडावी, विस्तार अधिकारी श्री. विरदंडे, श्री.तायडे, रुपेशकुमार श्रृपवार, ए.डी.भाविक, शैलेष कनेर, निलेश घनकर, संजय तिळेवाड, आशिष विनकरे, गावातील सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, तलाठी व ग्रामसेवक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी