फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेयची नोंद सातबारावर घ्यावी

पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅबपात्र जमिनीबाबत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांचे आवाहन यवतमाळ, दि 29 जून, (जिमाका) :- राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील ज्या स्लॅब पात्र भूधारकांच्या / खातेदांराच्या जमीनी संपादीत (निवाडा घोषित) करण्याची कार्यवाही अद्यापपर्यंत करण्यात आली नाही, परंतू पुनर्वसन अधिनियमातील तरतूदी अन्वये अशा जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्कामध्ये पुनर्वसनासाठी राखीव म्हणून शेरे नमुद करुन हस्तांतरणावर निर्बंध लावण्यात आले आहे, तसेच पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅबपात्र भुधारकांच्या खातेदाराच्या जमीनीच्या हस्तांतरण व्यवहारावर जमिनीच्या 7/12 उताऱ्याच्या इतर हक्कामध्ये कोणतीही नोंद न घेता काही प्रकरणी केवळ संबंधीत अधिसुचनेच्या आधारे निर्बंध लादण्यात आले आहे, अशा प्रकरणी “पुनर्वसन अधिनियमातील तरतूदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भुसंपादनाचा अधिकार अबाधीत ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय” करण्यात आले आहे. पुनर्वसन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचेकडून सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना सदर शासन निर्णयानुसार, पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅब पात्र भूधारकांच्या / खातेदाराच्या 7/12 च्या इतर हक्कामध्ये पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील जमीन बाबत “पुनर्वसन अधिनियमातील तरतुदी या अनुषंगाने राज्य शासनाचा भुसंपादनाचा अधिकार अबाधीत ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय” नोंद घेऊन कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सर्व तहसिल कार्यालयाकडून 7/12 च्या इतर हक्कामध्ये वरील प्रमाणे नोंद घेऊन कार्यवाही करण्यात आली आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांची शेतजमीन पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत असुन त्यांच्या जमीनीच्या 7/12 मध्ये वरील प्रमाणे नोंद घेण्यात आली नसल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये तशी नोंद घेण्यास संबंधीत तहसिलदार यांना कळवावे व आपल्या 7/12 मध्ये वरीलप्रमाणे नोंद करुन घेण्याबाबत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन बि.एच. बिबे यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी