अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात “जागतिक अन्न सुरक्षा दिन” संपन्न

यवतमाळ, दि 8 जून, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित “जागतिक अन्न सुरक्षा दिन” दिनांक 7 जुन 2022 रोजी साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षण विभाग प्रमुख डॉ.जयश्री उघाडे, प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.डी. पार्लावर तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अन्न व औषध प्रशासन चे सहायक आयुक्त कृष्णराव जयपूरकर व महाविद्यालयाच्या सहायक कुलसचिव स्वाती सोळंके उपस्थित होते. या प्रसंगी अन्न विषबाधा होवू नये याकरिता तसेच अन्न सुरक्षेबाबत उद्योजकांनी घ्यावयाची काळजी याबाबत कृष्णराव जयपूरकर मार्गदर्शन केले. ग्राहकांची वेगवेगळया स्तरावर होणारी फसवणूक व त्याचे निरसन करण्याकरिता विविध नियम व कायद्यांची अंमलबजावणी करण्याकरिता अन्न आणि औषध प्रशासन विभाग कसे कार्य करते, याबाबत त्यांनी माहिती दिली. अन्न सुरक्षा हि काळाची गरज असल्याने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करीत असतांना उद्योजकांनी गुणवत्तापूर्ण व सुरक्षित अन्न पदार्थ तयार करणे गरजेचे असल्याचे डॉ. एन. डी. पार्लावर यांनी सांगितले. मानवी जीवनात अन्न सुरक्षेचे महत्व व अन्न प्रक्रियेमध्ये नव उद्योजकांनी कशा पध्दतीने अन्न सुरक्षित ठेवण्याकरिता काळजी घ्यावी, तसेच ग्राहकांनी अन्न पदार्थ खरेदी करतेवेळी जागरुक राहून खाद्यपदार्थांची खरेदी करावी याविषयी अध्यक्षीय भाषणात डॉ.जयश्री उघाडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी आयुष कुमार, साफिया खान, रोहन राठोड, विशाखा हिवाळे,दर्शना एकलारे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन भारताचा स्वातंत्र्य महोत्सवी वर्षात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्रा. आनंद भुसारी उपकार्यकारी अधिकारी, रासेयो, डॉ. निखील सोळंके, डॉ.प्रदिप थोरात व श्री. भुषण जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निखील सोळंके यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी कु.सुकन्या अडकीने व प्रथमेश महांगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन यश वालदे यानी केले. महाविद्यालयाचे अधिकारी-कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी