लाेहारा येथील कंपनीच्या प्रकल्पावर पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी 25 जुलै रोजी

यवतमाळ, दि 30 जून, (जिमाका) :- मे.बालाजी इलेक्ट्रो स्मेल्टर्रस प्रा.लि., एम.आय.डी.सी. लोहारा, यवतमाळ या कंपनीद्वारे लोहारा, येथे ७.५ MVA सबमर्ज आर्क फर्नेसच्या स्थापने द्वारे फेरो अलॉयज प्लॉटचे विस्तारीकरण व सिन्टर प्लॉटसह थर्माइट प्रक्रियेद्वारे नोबेल फेरो अलॉयज चे उत्पादन करणे व सिन्टर प्लॉट या प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी घेणे बाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचेकडे अर्ज सादर केला आहे. सदर प्रकल्पामुळे यवतमाळ तालुक्यातील लोहारा,भुयार,वाघापुर, चिंचबर्डी, इचोरी, किन्ही ही गावे प्रभावित होणार आहे. त्याअनुषंगाने प्रस्तावित प्रकल्पाची जाहिर जनसुनावणी 25 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रकल्प स्थळ, प्लॉट नं.बी- १७,बी- १७/१ आणि बी १/१ एम आय डी सी लोहारा, ता.जि. यवतमाळ येथे मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली आहे. सदर सुनावणी कंपनीचे परीसरात तसेच ऑनलाईन पध्दतीने वे-बॅक्स ॲप व्दार घेण्यात येईल. मौखिक किंवा लेखी आक्षेप जाहिर जनसुनावणीच्या वेळीसुध्दा नोंदविता येईल. सदर प्रकल्पाचा पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल पर्यावरण व्यवस्थापन योजना व कार्यारी सारांश या पुस्तकाचे संच व CD च्या स्वरुपात उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे उपलब्ध असून इच्छुक व्यक्तीस मागणीनुसार अभ्यासाकरीता उपलब्ध करुन देण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी