सैनिकांच्या पेंशन प्रणाली “स्पर्श” वर पुलगाव येथे कार्यशाळा
22 जून रोजी आयोजन
यवतमाळ, दि 21 जून, (जिमाका) :- संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी/सैनिकांच्या पेंशन वाटपाची नविन प्रणाली “स्पर्श” टप्याटप्यात लागू करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी सी.ए.डी. पुलगांव येथील प्रेक्षागृहात बुधवार दिनांक 22 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिक / विधवा माजी सैनिक पेंन्शनधारक यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.
000
बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान
पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पना > आज दारव्हा येथून होणार अभियानाला सुरुवात > यवतमाळ जिल्ह्यातील युवक-युवतींना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे > युपीएससी, एमपीएससीसह सरळसेवा परीक्षांविषयी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन > ग्रामपंचायतींमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तके जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची उद्या दि. २० जानेवारी दारव्हा येथून सुरुवात होणार आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेविषयी अचूक मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मोफत अभ्यास साहित्य सर्व ग्रामपंचायतींमार्फत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, विविध सरळसेवा भरती परीक्षांविषयी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ...
Comments
Post a Comment