अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात

जागतिक पर्यावरण दिन साजरा यवतमाळ, दि 7 जून, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित “जागतिक पर्यावरण दिन” दिनांक ०६ जुन २०२२ रोजी साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात, शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जयश्री उघाडे, प्रा. आनंद भुसारी व डॉ. निखील सोळंके यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी यवतमाळ बस स्थानक येथे स्वच्छता अभियान नियंत्रण अधिकारी श्रीमती साठवणे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आले. यवतमाळ येथील बस स्थानक परिसरातील प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली. त्यानंतर स्थानिक बस स्थानक ते दत्त चौक पर्यंत पर्यावरण जनजागृती पायदळ रॅली काढण्यात आली. त्यादरम्यान पर्यावरण संवर्धना संदर्भात, जागतिक तापमान वाढ तसेच निसर्गातील समतोल साधण्याकरिता झाडांचे महत्व विषद करणारे विविध माहिती फलक दर्शवून विविध नारे विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले. तसेच स्थानिक दत्त चौक भाजी बाजार येथे भाजी विक्रेते व ग्राहक यांना महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनि स्वतः तयार केलेल्या पर्यावरण पूरक कागदी व कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. प्लास्टिक पिशवीचा वापर न करणेबाबत विद्यार्थ्यानी भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांना मार्गदर्शन करून जनजागृती केली. सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने उत्स्पुर्त सहभाग नोंदविला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी