नगरपरिषद निवडणूक आरक्षणावर आक्षेप आमंत्रित

यवतमाळ, दि 15 जून, (जिमाका) :- जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, आर्णी, दारव्हा व घाटंजी या नगरपरिषदांच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीकरीता दिनांक 13 जून 2022 रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण प्रर्वगातील महिलांचे आरक्षण सोडत पध्‍दतीने निश्चित करण्‍यात आलेले आहे. सदर आरक्षणाची अधिसूचना सबंधीत नगरपालीका कार्यालयाचे सुचना फलकावर तसेच जिल्‍हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर व yavatmal.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आली असून कार्यालयीन वेळेत पाहण्‍यासाठी उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. तरी उक्‍त नगरपरिषद क्षेत्रातील ज्‍या रहिवाश्यांना या संबंधात काही हरकती व सूचना दाखल करावयाच्‍या असतील, त्‍यांनी संबंधित नगरपरिषद कार्यालयामध्ये दिनांक 15 जून ते 21 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत कारणासहीत लेखी स्‍वरुपात सादर कराव्‍यात, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी