गेल्या 24 तासात एक कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळ, दि 17 जून, (जिमाका) :- गेल्या 24 तासात यवतमाळ शहराच्या भोसा परिसरातील 70 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 413 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 412 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79074 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77267 आहे. ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात दोन व बाहेर जिल्ह्यात दोन अशी एकूण चार झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 76 हजार 106 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 97 हजार 32 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.03 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.24 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे. नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती