10 जून रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

2263 पदांकरिता नामांकित कंपनीत रोजगाराच्या संधी यवतमाळ, दि 7 जून, (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयामार्फत दि. 10 जून 2022 रोजी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र, जुने बस स्टँडजवळ, यवतमाळ येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, टिव्हिएस चेन सप्लाय ग्रूप, व्हेराक इंजिनिअरींग, वाळुज, डुरेव्हॉल्स औरंगाबाद, सारा स्पिंटेक्स यवतमाळ, तिरुमला इंडस्ट्रिएल ॲण्ड अलाईड प्रा.लि.धृत ट्रान्समिशन औरंगाबाद, देवगिरी फॅारगिव्हींगस औरंगाबाद, मस्कार पिसीझन औरंगाबाद इत्यादी विविध नामांकित कंपन्यामधील 2263 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. रोजगार मेळाव्यासाठी 10 वी, 12 वी, आयटिआय, पदविकाधारक, पदविधर तसेच ईतर व्यावयिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले 18 ते 35 वयोगटातील ईच्छुक उमेदवारांनी 10 जून रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. उमेदवारांनी मुलाखतीला येतांना स्वतचा बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक शैक्षणकि कागदपत्रे सोबत आणावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या 07232-2443952 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी