घाटंजी येथे 16 जून रोजी रक्तदान शिबीर

यवतमाळ, दि 15 जून, (जिमाका) :- अतिरिक्त रक्त स्त्राव, थॅलेसोमीया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसुतीपश्चात रक्तस्त्राव, शस्त्रक्रीया आणि इतर गंभीर आजारांमध्ये योग्यवेळी रुग्णाला वेळेवर रक्त मिळाले नाही तर रुग्ण रक्ताअभावी दगावण्याची शक्यता असते. श्री वसंतराव नाईक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व रुग्णालय यवतमाळ येथे वरील सर्व अत्यावश्यक बाबीकरीता रक्ताची कमतरता भासत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत व जागतीक आरोग्य संस्थेने 14 जुन हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणुन घोषित केलेला आहे. यांचे औचित्य साधुन घाटंजी तालुक्यामध्ये दिनांक 16 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता तहसिल कार्यालय घाटंजी येथे रक्तदान शिबीर घेण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. सदर महारक्तदान शिबीरामध्ये 16 जून रोजी जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेवुन सामाजिक दायीत्व जपण्यास मदत करावी, असे आवाहन घाटंजीच्या तहसिलदार पुजा माटोडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल