3 जून रोजी पुन्हा एक बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

यवतमाळ, दि 10 जून, (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यातील रोहडा ता.पुसद जिल्हा यवतमाळ या गावी अल्पवयीन बालिकेचा बालविवाह 3 जून रोजी थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. बाल विवाह होत असलेबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षास माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार 3 जून रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता वनिता शिरफुले, माहिती विश्लेषक सुनील बोक्से यांनी तातडीने रोहडा ता. पुसद या गावी भेट देवून खंडाळा पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय पुसद, बालविकास कार्यालय पुसद यांना बालविवाह बाबत माहिती देण्यात आली. त्यांनी अल्पवयीन बालिकेच्या कुटुंबास प्रत्यक्ष भेट देऊन बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत शिक्षेस पात्र होऊ शकता अशी माहिती देण्यात आली. बालिकेच्या आई वडिलांकडून बालिकेचा विवाह 18 वर्ष पूर्ण झालेनंतर विवाह करण्यात यावा असा जबाब लिहून घेण्यात आला व त्याप्रमाणे सुचना पत्र सुध्दा देण्यात आले. सदर बालविवाह थांबविण्यास खंडाळा पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक निरंजन आडे, तहसील कार्यालय पुसद चे तलाठी शिवाजीराव देशमुख, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता वनिता शिरफुले, माहिती विश्लेषक सुनील बोक्से, गावातील अंगणवाडी सेविका रेखा पोपळघाट व विजया कानडे, ग्रामपंचायत रोहडा चे कर्मचारी गजानन श्यामसुंदर, पोलीस पाटील राजकुमार पारीसकर, चाईल्ड लाईन चे दिलीप दाभाडेकर व दिव्या दानतकर इत्यादी च्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी