पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना संत्रा पिकासाठी 14 जून व मोसंबी पिकासाठी 30 जून 2022 अंतीम दिनांक

 



 

Ø  शेतकऱ्यांना विमा हप्ता रुपये चार हजार प्रति हेक्टर

 

यवतमाळ, दि 3 जून, (जिमाका) :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना 2022-23 मृग बहारामध्ये संत्रा व मोसंबी या पिकांकरीता यवतमाळ जिल्ह्यात लागु करणेबाबत शासनाने दि. 18 जून 2021 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे.

संत्रा व मोसंबी पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 80 हजार असून शेतकऱ्यांना विमा हप्ता प्रत्येकी रुपये चार हजार प्रति हेक्टर रक्कम भरावयाची आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरीता संत्रा पिकाची अंतीम दिनांक 14 जून 2022 व मोसंबी पिकाची अंतीम दिनांक 30 जून 2022 आहे. यासाठी विमा कंपनी रिलायंस जनरल इन्शुरन्स कं.ली., वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, 5 वा मजला, चिंतामणी अव्हेन्यु, विरानी औद्योगिक वसाहत जवळ, गोरेगाव (इ), मुंबई- 400063. ग्राहक सेवा क्र.:18001024088 दुरध्वनी क्र. 02268323005 ई –मेल : rgicl.maharashtraagri@relianceada.com या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पुढील महसुल मंडळ मध्ये पिक विमा योजना राबविण्यांस मान्यता देण्यांत आलेली आहे. मोसंबी पिकासाठी राळेगांव तालुक्यात धानोरा येथे तर संत्रा पिकासाठी आर्णी तालुक्यात आर्णी व जवळा , उमरखेड तालुक्यात उमरखेड मुळावा, ढाणकी, विडूळ, चातारी, कुपटी, निंगणुर,  कळंब तालुक्यात कळंब, कोठा, सावरगांव, जोडमोहा, पिंपळगांव रु, मेटीखेडा,  दारव्हा तालुक्यात दारव्हा, महागांव, लोही,  दिग्रस तालुक्यात दिग्रस, कलगांव, तिवरी, तुपटाकळी, सिंगद, नेर तालुक्यात माणिकवाडा, वटफळी, शिरजगांव, मालखेड बु,. पुसद तालुक्यात पुसद, जांबबाजार, वरुड, बोरी खु., गौळ खु. बाभुळगाव तालुक्यात घारफळ,  महागाव तालुक्यात मोरथ, गुंज, काळी दौ., कासोळा व राळेगाव तालुक्यात राळेगाव, झाडगाव, धानोरा हे महसुल मंडळ अधिसुचित करण्यात आले आहे.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक स्वरुपाची आहे. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.एम. कोळपकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी