माॅडल रास्तभाव दुकानाचा अवलंब पुर्ण जिल्ह्यात करा- जिल्हाधिकारी

* मॉडेल रास्तभाव धान्य दुकानाचे उद्घाटन यवतमाळ दि. 28 : जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तयार केलेल्या मॉडेलप्रमाणे तयार करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांना आणि लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरावे म्हणून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी जिल्हा पुरवठा कार्यालय यवतमाळ येथे मॉडेल रास्तभाव धान्य दुकानाची निर्मिती केलेली असून सदर मॉडेल रास्तभाव धान्य दुकानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर मॉडेल रास्तभाव धान्य दुकानाची पाहणी केली. यावेळी विविध माहिती दर्शक फलके जसे- रास्तभाव दुकानाचे नाव, साठा फलक, भाव फलक, शिधापत्रिका तपशील फलक, वाटपाचे प्रमाण दर्शविणारा फलक, दक्षता समिती फलक, पुरवठा विभागाच्या विविध योजनांचे निकष दर्शविणारा फलक, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभ दर्शविणारा फलक, वजने पडताळणी प्रमाणपत्र, परवाना प्रत, प्रथमोपचार पेटी, हरवलेल्या शिधापत्रिकांची पेटी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत, धान्याच्या पोत्यांची रचना, ऑनलाईन डी-वनची प्रत, धान्याचे नमुने, रास्तभाव दुकानाचे संबंधीत विविध अभिलेखे व तक्रार करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक दर्शविणारा फलक ईत्यादीची पाहणी करुन मॉडेल रास्तभाव दुकानाची प्रशंसा केली व जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकाने या मॉडेलप्रमाणे तयार करुन घेण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिल्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शेखर पुनसे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी