सर्व खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांना ईआर प्रपत्र सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पूरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक किंवा आस्थापनांनी सेवायोजन कायद्यान्वये त्रैमासिक रोजगार परतावा (ईआर 1) ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर अखेर संपणाऱ्या त्रैमासिकासाठी ईआर 1 या प्रपत्राची माहिती रोजगार महास्वयम या संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकिय, खाजगी उद्योजक किंवा आस्थापना यांनी त्यांचे युझर आय डी व पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून ऑनलाईन सादर करावे व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावे. ऑनलाईन ईआर 1 सादर करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४३९५ यावर संपर्क साधावा. ईआर 1 प्रपत्र सादर करण्याची अंतिम मुदत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आहे. ईआर 1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या कसूरदार आस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि.सा.शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी