दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान

सहकारी दुध संघ, खाजगी दुध प्रकल्पांनी अर्ज सादर करावा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांचे आवाहन राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर राज्य सरकारकडून 5 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्प यांनी स्वंतत्र अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी केले आहे. फॅट व एसएनएफ 3.5/8.5 या गुणप्रतिपेक्षा पॉईट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफकरिता प्रत्येकी 30 पैसे वजावट करणेत येईल तसेच प्रती पॉईट वाढीकरिता 30 पैसे वाढ करण्यात येणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या रुपये 5 प्रतिलिटर दुधास अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी सहकारी दूध संघ व खाजगी प्रकल्पांनी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास विभाग, मुंबई यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी अर्ज करतांना सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पकांकडून कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. त्यानुसार सहकार ,मल्टीस्टेट दूध संघासाठी संघाच्या लेटर पॅडवर अर्ज/ठराव, या अर्जासोबत सहकारी संघाचे नोंदणी प्रमाणपत्र,एफएसएसएआय चे प्रमाणपत्र, संचालक मंडळाची यादी तसेच खाजगी दुध प्रकल्पांसाठी खाजगी प्रकल्पाच्या लेटर पॅडवर अर्ज किंवा ठराव किंवा पावर ऑफ अॅटर्नी, औद्योगिक विभागाचे कारखाना नोंदणी प्रमाणपत्र, एफएसएसएआय चे प्रमाणपत्र, बोर्डाची यादी, इ. कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. या अनुदान योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दूध संघ व खाजगी दुध प्रकल्प यांनी डिबीटी करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डसोबत व पशु धनाच्या कानातील बिल्याशी (ईएआर टॅग) संलग्न (लिंक) करणे आवश्यक आहे. या योजनेत दुध दत्पादक शेतकरी दुध संघास, खाजगी दुध प्रकल्पास दूध पुरवठा करतात ते शेतकरी सहकारी संघ किंवा खाजगी प्रकल्पामार्फत सहभागी होवू शकतात. या योजनेचा कालावधी 11 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्प यांनी आपला स्वंतत्र अर्ज माहितीसह ddcmaharashtra@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावा, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. जया राऊत यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी