स्टेशन हेड क्वॉर्टर पुलगांवतर्फे माजी सैनिकांचा भव्य मेळावा

विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या पाच जिल्ह्यातील माजी सैनिक व विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जॉग स्टेडीयम ग्राऊंड, पोलीस मुख्यालयाजवळ, अमरावती येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्टेशन हेड क्वॉर्टर उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरिया तसेच स्टेशन हेड क्वॉर्टर पुलगांव यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जनरल ऑफीसर कमांडींग यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. मेळाव्यामध्ये सिएसडी कॅन्टीन, आर्मीचे अभिलेख कार्यालय, ईसिएचएस सुविधा, बँक, स्पर्श संबंधित सुविधा उपलब्ध राहणार आहेत. स्टेशन हेड क्वॉर्टर पुलगांव तर्फे अमरावती रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड येथुन ने-आण करण्याची सोय तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त युध्द विधवा, माजी सैनिक, विधवा अवलंबितांनी परिवारासह मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रकाश राऊत यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी