आदिवासी भागात सांस्कृतिक संकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करावे

प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पुसद या कार्यालयांतर्गत चालू आर्थिक वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, महागाव, उमरखेड व नेर या सात तालुक्यातील आदिवासी भागामध्ये सांस्कृतिक संकुल बांधण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडून परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले आहे. हे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय जवळ, संत सेवालाल चौक, पुसद येथे २५ जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांनी केले आहे. या योजनेच्या निकषानुसार सांस्कृतिक भवन किंवा सांस्कृतिक संकुल बांधकामाकरिता जमीन विनामूल्य असणे आवश्यक आहे. जमीन विनामूल्य उपलब्ध असल्याचे ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा ठराव आवश्यक आहे. जागेचा मूळ सातबारा व उतारा, जागेचा मोजणी नकाशा, ज्या ठिकाणी संकुल मंजूर करावयाचे आहे तेथील आदिवासी लोकसंख्या तसेच त्या परिसरातील किती गावांना किंवा लोकसंख्येला आदिवासी योजनेचा लाभ होणार आहे याचा सांख्यिकी तपशील, सांस्कृतिक संकुल किंवा भवन बांधकामाच्या जमिनीवर अतिक्रमण अथवा न्यायालयात दावा दाखल नसल्याबाबतचा दाखला देणे आवश्यक आहे. बांधकाम क्षेत्रफळ कमीत कमी 437 चौरस मीटर असावेत, असे निकष ठरविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी