आदिवासी युवकांना व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण 10 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी युवकयुवतींना व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद या कार्यालयातंर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प 2022-2023 न्युक्लिअस बजेट योजनेअंतर्गत नोंदणीकृत सेवाभावी संस्थेकडून आदिवासी युवक-युवतींना व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रस्तावाचा अर्ज या कार्यालयाकडे उपलब्ध असून अर्ज परिपूर्ण प्रस्तावासह दि. 10 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद येथे प्रत्यक्ष सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस