यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात पाठविता येणार आहेत. या स्पर्धेसाठी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा येथे विनामूल्य उपलब्ध होतील. तसेच महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर 'स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार- 2023 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिवस 31 जानेवारी, 2024 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिवांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी