मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्काची रक्कम सात दिवसात महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन

केंद्र शासनाचे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयात नमुद केल्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची 60 टक्के हिस्साची रक्क्म महाडीबीटी प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झाल्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करुन उर्वरित शिक्षण शुल्क, इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास सात दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची सन 2021-22 व 2022-23 वर्षातील केंद्र शासनाची 60 टक्के रक्क्म विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात अशी रक्क्म जमा झाली आहे अथवा काही दिवसात जमा होणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी जमा रकमेमधून निर्वाह भत्त्याची रक्क्म वजा करुन उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी. या प्रमाणे कार्यवाही न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांची राहील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी