वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे - डॉ.पंकज आशिया

जिल्ह्यातील दुचाकी, चारचाकी वाहनचालकांनी रस्त्यावर वाहन चालवितांना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी रस्ता सुरक्षा अभियानांच्या उद्घाटनावेळी केले. रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांचे निदर्शनानुसार १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियांनांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ तर्फे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी धोत्रे, प्रकल्प संचालक अमरेश मानकर, राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, पोलिस निरिक्षक अजित राठोड, यवतमाळ शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य मोगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे उपस्थित होते. या कार्यक्रमात शासकीय तंत्रनिकेतन येथील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी रस्ता व वाहतूक नियमांचे पालन करावे. रस्ते व वाहतूक नियमाचे पालन करण्याची शिस्त आपल्या जीवनशैलीत अंतर्भूत करण्याचे आवाहन केले. तसेच पोलिस निरिक्षक राठोड आणि श्री धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक संदीप खवले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोटार वाहन निरिक्षक नानासाहेब शिंदे यांनी केले. पुढील एक मिहना दररोज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये रिफ्लेकव्टिव टेप लावणे, हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करणे, अपघात प्रवण क्षेत्राची तपासणी करणे, अतिवेगाने जाणारी वाहने विषयक कारवाई करणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करणे, रक्तदान शिबीराचे आयोजन करणे, ड्रिक आणि ड्राइव्ह विषयक कारवाई करणे, चमकदार लाईट्स लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे इत्यादी उपक्रम महिनाभर राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ लिपिक सुनिल गुल्हाणे, निखिल भेंडारे व कनिष्ठ लिपिक किशोर आडे, राम अडबलवाड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले. ०००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी