विजाभज प्रवर्गाला मोदी आवास योजनेचा लाभ मिळावा ; पालकमंत्री संजय राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्य सरकारच्या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ ओबीसींप्रमाणे राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींना मिळावा, अशी मागणी मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या योजनेचा राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींना लाभ मिळावा यासाठी पालकमंत्री संजय राठोड शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. राज्य सरकारने या योजनेत इतर मागास प्रवर्गाप्रमाणे विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश केल्यास समाजातील असंख्य गरजूंना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. राज्यात वेगळ्या प्रवर्गात असल्याने विजाभज घटकातील पात्र लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा शासन निर्णय जुलैमध्ये जारी केला असून या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू आहे. मोदी आवास योजनेचा लाभ इतर मागास प्रवर्गाप्रमाणे विजाभज प्रवर्गाला मिळावा अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे. या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करून निर्णय घेतल्यास राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या हजारो लोकांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करता येणार आहे, त्यामुळे मोदी आवास योजनेत विजा भज प्रवर्गाला समाविष्ट करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी