शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्याने "शिवोत्सव" महाप्रतियोगितेचे आयोजन

ऋणानुबंध फॉउडेशन व्दारा आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्याने "शिवोत्सव" महाप्रतियोगिता आयोजित करण्यात आलेली आहे. या निमित्याने समाजातील सर्व स्तरावरील विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग होऊन प्रत्येकाच्या मनातील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे विचार प्रकट स्वरुपात समाजापुढे यावे हा प्रमुख उद्देश आहे. त्या अनुषंगाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरीक व शासनमान्य अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयातील वाचक,सभासद यांनी "शिवोत्सव" महाप्रतियोगितेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, श्रीमती कविता महाजन यांनी केले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता व सविस्तर माहितीकरिता www.rfbharat.com या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस