‘जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

* समता मैदान येथे २९ ते ३१ जानेवारी रोजी नाट्यप्रयोग * महानाट्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘जाणता राजा’ या तीन दिवसीय महानाट्याचा शुभारंभ २९ जानेवारीपासून यवतमाळात होणार आहे. या महानाट्याच्या तयारीचा जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी आज आढावा घेतला. शहरातील पोस्टल ग्राऊंड येथे होणाऱ्या महानाट्य आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात बैठक झाली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. सुखदेव राठोड, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी रंजन वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.क्षीरसागर आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या महानाट्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला नेमून दिलेल्या कामकाजाची माहिती घेवून ‘जाणता राजा’ महानाट्य प्रयोगाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना देत या महानाट्य प्रयोगाला नागरिकांनी मोठ्यासंख्येत उपस्थित राहुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र समजून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांनी केले. यावेळी फेब्रुवारीत होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजनाबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. या महोत्सवात होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, रुपरेषा, सोयीसुविधा, स्थळ निश्चिती, नागरिकांचा सहभाग वाढवणे, पारंपरिक खेळांचे आयोजन आदी विषंयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महासंस्कृती महोत्सव आयोजनाच्या तयारी लागा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिले. 000000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी