नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरु होणार

जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरुन करण्यात येणार आहे. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत एकही व्यवहार झालेला नाही असे तालुक्यातील 57 सेतू केंद्र किंवा सीएससी सेंटर बंद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. संबंधितांनी दि. 22 जानेवारी पूर्वी यवतमाळ तहसिल कार्यालयास स्वतः हजर राहून म्हणणे सादर करावे, असे आवाहन तहसिलदार योगेश देशमुख यांनी केले आहे. शासनाने दि. 19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयान्वये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निकष, कार्यपध्दती व इतर बाबींविषयी विस्तृत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरुन करण्यात येणार आहे. राज्य सेवा आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यातील बंद स्थितीत असलेले आपले सरकार सेवा केंद्राबाबत चर्चा करुन नागरिकांच्या सोयीसाठी हे केंद्रे लवकरात लवकर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील बंद पडलेली आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याच्या अनुषंगाने पात्रतेच्या निकषानुसार अन्य इच्छुक उमेदवारास देण्याची शक्यता पडताळावी व दि.19 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीच्या अधीन राहून आपले सरकार सेवा केंद्रे पुन्हा सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी, असे नमूद आहे. आजपर्यंत एकही व्यवहार झालेला नाही असे 57 बंद पडलेल्या सेतू केंद्र किंवा सीएससी सेंटरची यादी यवतमाळ तहसिल कार्यालयामार्फत जारी करण्यात आली आहे. सर्व सेतू केंद्र किंवा सीएससी सेंटरमध्ये मागील एप्रिल, 2023 ते आजपर्यंत एकही व्यवहार झालेला नाही असे सेतू केंद्र बंद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर केंद्र हे कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे. संबंधितांनी दि. 22 जानेवारी पूर्वी यवतमाळ तहसिल कार्यालयास स्वतः हजर राहून म्हणणे सादर करावे. विहीत मुदतीत म्हणणे सादर न केल्यास सेतू केंद्र किंवा सीएससी सेंटर कायमस्वरुपी बंद करण्यात येईल, असे आवाहन तहसिलदार योगेश देशमुख यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी