न्युक्लिअस बजेट अंतर्गत प्रशिक्षण योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडाच्यावतीने प्रकल्पात समाविष्ठ टिएसपी व ओटिएसपी क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या सामुहिक लाभाच्या प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. या प्रशिक्षण योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे. न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत आश्रमशाळेवरील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण, शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळेवर सीपीआर ट्रेनिंग, गुड टच बॅड टचबाबत मार्गदर्शन, आश्रमशाळेवरील विद्यार्थ्यांना संगित कलेचे प्रशिक्षण, आश्रमशाळेवर घनकचरापासून सेंद्रीय खत निर्मितीचे मशिन खरेदी, महिला बचत गटासाठी अर्थसहाय्य करणे, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देणे, आश्रमशाळेमध्ये ॲडव्हांस स्टेम्स लॅब स्थापन करणे, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अबॅकसचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी बिझनेस डेव्हलपमेंटबाबत कार्यशाळा आयोजित करणे या योजना राबविण्यात येत आहे. यासह गोंडवाना सम्राज्ञी दुर्गावतीबाबत दोन प्रयोग सादर करणे, बिरसा मुंडा महानाट्याचा प्रयोग सादर करणे, आदिवासी पारधी किंवा फासेपारधी पाड्यावर जनजागृती करणे, आश्रमशाळेवरील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली बोर्डाप्रमाणे उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन करणे, आदिवासी महिला बचत गटांना कृषी मालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण, आदिवासी महिला बचत गटांना मध संकलनासाठी कार्यशाळेचे आयोजन, आश्रमशाळेतील कॉम्प्यूटर लॅब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन, आश्रमशाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकाचा पुरवठा करणे आणि आदिवासी लाभार्थ्यांचे घराचे विद्युतीकरण करणे इत्यादी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी परिपूर्ण दि.२५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा येथे किंवा नजिकचे आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह, शासकीय आश्रमशाळा येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्तावासोबत स्वयंसेवी संस्थेकडे पाच लाख रुपयाचे बँक सॉलव्हेंसी सर्टिफीकेट आणि तीन वर्षाचे संस्थेचे लेखापरिक्षण (ऑडीट) अहवाल सोबत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 07235-227436 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी