नानकीबाई वाधवानी कला महविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची उपस्थिती

येथील श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महविद्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची उपस्थितीत १४ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय मतदार दिनाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाधवानी अध्यक्ष यवतमाळ सेवा समिती यवतमाळ तसेच प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया होते. यासह उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल चान्देवार उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात आयोगाकडून प्राप्त शपथ घेवून करण्यात आली. सन २०२३ या वर्षात उत्कृष्ट नवमतदार नोंदणी केलेले महाविद्यालय म्हणून अमोलाकचंद महाविद्यालय, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, आबासाहेब पारवेकर यवतमाळ यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून इंदू तीरमारे, संगीता खोब्रागडे, राजेश बरडे, सचिन इंगोले, वंदना राऊत, मंजुषा डेरे यांचासुद्धा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे आयोगाकडून दिलेल्या सूचनेनुसार रांगोळी, चित्रकला, वकृत्व स्पर्धा विविध महाविद्यालयात घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत विजयी विद्यार्थी यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. सावित्री जोतीराव फुले समाजकार्य महाविद्यालय यांनी निवडणूक मतदान जनजागृती करिता पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार डॉ योगेश देशमुख यांनी तर सूत्रसंचालन विद्या चिंचोरे यांनी केले सदर कार्यक्रमाकरिता संस्थेचे प्राचार्य डॉ जयंत चतुर, निवडणूक नायब तहसीलदार राजेश काहारे, महसूल सहायक वैभव पवार, संगणक परिचालक मोहसीन खान यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी