पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा एक दिवसीय जनजागृती मेळावा

केंद्र शासनाच्या पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा एक दिवसीय जनजागृती मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सभेला पुसदचे सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाठे, जिल्हा उद्योग केंद्र प्रविण रंगारी, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे विशाल मनवर, सि.एस.सी सेंटरचे जिल्हा समन्वयक मुकुंद ठाकरे, जिल्हा अग्रणी बँकचे प्रबंधक श्री. गजभिये, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी. एम. राठोड उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे सादरीकरण एमएसएमई नागपूरचे सहायक संचालक पि. टी. डोईफोडे यांनी केले. सहायक संचालक राहुलकुमार मिश्रा यांनी संचालन केले. या मेळाव्यात पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतील अडीअडचणीचे निरसन करण्यात आले. पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागिरांना व्यवसायासाठी पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत ३ लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार असून प्रशिक्षण व साहित्य किट देण्यात येणार आहे. परंतु यासाठी सरपंचाची देखील नोंदणी करणे आवश्यक असून त्यांची मान्यता आवश्यक आहे. या योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८७२४ कारागिरांनी अर्जाची नोंदणी केली असून १२०१ ग्रामपंचायती पैकी १०३७ सरपंचाची नोंदणी झाली आहे. ही योजना ग्रामीण व शहरी लघु व्यवसायासाठी कल्याणकारी ठरत आहे. योजनेंतर्गत लोहार, सुतार, नाविक, सोनार, कुंभार, मुर्तीकार, टेलर, धोबी, मच्छीमार, झाडु बनविणारे कारागिर आदींना आधुनिक यंत्र उपकरणे खरेदीसाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. १८ पारंपरिक व्यवसायांचा या योजनेत समावेश आहे. विश्वकर्मा योजना ही समाजातील कारागीरांकडे भांडवल नसेल तर त्यासाठी त्यांना केंद्र शासनाने सुरु केली आहे. यातून त्यांना व्यवसाय वाढविणे शक्य होणार आहे. या योजनेसाठी काही कागदपत्रे आवश्यक आहे. त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पासपोर्ट, जातीचा दाखला आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या कारागीरांनी सामुहिक सुविधा केंद्रावर अर्थात सिएससी सेंटरवर जावून जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी.एम. राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी