बाभूळगाव येथील रोजगार मेळाव्यात 190 उमेदवारांची प्राथमिक निवड

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभुळगावच्या संयुक्त विद्यमाने आ.डॉ. अशोक उईके यांच्या मतदारसंघातील बाभूळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी 190 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्यामध्ये एकूण 11 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. कंपन्यांकडील 2 हजार 193 रिक्त पदे अधिसूचित करून मुलाखतीकरीता कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी मेळाव्यास उपस्थित होते. रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आ.डॉ.अशोक उईके यांनी उपस्थित उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले. उमेदवांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्याकरिता शुभेच्छा दिल्या. सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी मेळाव्याचा लाभ घेऊन मुलाखती देण्याकरिता विद्यार्थ्यांना आवाहन केले. या मेळाव्याचा एकूण 300 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला तर एकूण 190 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली. प्रत्यक्ष त्या ठिकाणीच कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे एकूण 17 विद्यार्थ्यांची ऑफर लेटर देऊन निवड केलेली आहे. मेळाव्यास स्वयंरोजगाराच्यादृष्टीने तसेच कर्ज योजनेच्यादृष्टीने विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्यादृष्टीने त्यांच्याकडे असलेल्या कर्ज योजनेविषयी माहिती दिली. हा रोजगार मेळावा यशस्वी करण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभुळगावचे प्राचार्य विशाल मिलमिले यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी