जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात लघूपट स्पर्धेचे आयोजन

जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करीता जिल्हास्तरावरुन विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षा च्या वतीने लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ व प्रकल्प संचालक पाणी व स्वच्छता जि.प. यवतमाळ यांनी केले आहे स्पर्धेसाठी निवडक सात विषयांचे लघुपट सादर करायचे आहे. पाण्याचे शाश्वत स्त्रोत, पाणी पुरवठा देखभल दुरुस्ती, जल संवर्धन, हर घर जल घोषीत गाव विकास, जल जीवन मिशन यशोगाथा, विविध योजनांचे कृती संगम या विषयावर लघुपट निर्मिती करायची आहे. या विषयांपैकी स्पर्धकाने एकाच विषयावर लघुपट तयार करायचा आहे. लघुपट तीन ते पाच मिनिटाचा तयार करायचा आहे, स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या लघुपटाची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या स्पर्धंकाला बक्षिस स्वरुपात रक्कम देण्यात येईल. प्रथम पुरस्कारासाठी 31 हजार रुपये, व्दितीय पुरस्कारासाठी 21 हजार रुपये, तृतीय पुरस्कारासाठी 11 हजाररुपये आहे. स्पर्धे करीता राज्य स्तरावरुन देण्यात आलेल्या नियमांच्या अधिन राहून स्पर्धकाला लघुपट तयार करायचा आहे. यात स्पर्धेकांनी लघुपटाची निर्मिती स्वतः करणे आवश्यक आहे. पटकथा दृश्य संकल्पना संवाद पार्श्वसंगीत, गित चित्रीकरण हे स्वतः स्पर्धकाने तयार केलेले असावे. अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती संस्था कंपनी शासकीय विभाग यांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट या स्पर्धेसाठी सादर करता येणार नाही. या स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारे लघुपट या बाबतचे कॉपी राईट बाबतचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषीत प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाला सादर करणे बंधनकारक आहे. लघुपट निर्मिती साठी वापरण्यात आलेले शूटींग साहित्य व्यावसायिक दर्जाचे व उत्तम असावे. लघुपट कोणाच्या ही भावना व अस्मिता दुखावणारे नसावे. लघुपट निर्मितीची प्रमाण भाषा फक्त मराठी असावी फक्त मराठी भाषेतच लघुपट निर्मिती करावी. जिल्हास्तरावर सादर केलेल्या सर्व लघुपटाचे जिल्हास्तरीय समिती कडून परीक्षण करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी तयार केलला लघुपट 20 जानेवारी पर्यंत waterquality.yavatmal@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा पेनड्राइवमध्ये पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा प‍‌षिद, तिसरा माळा आर्णी रोड यवतमाळ येथे सादर करावा, नंतर येणाऱ्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही, स्पर्धेचा निकाल व निवडी बाबतचे सर्व अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे राहातील, असे जिल्हा प्रकल्प संचालकांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी