सावकरी पथकाकडून अवैध सावकारी करण्याऱ्यांच्या घरी झडती

नेर तालुक्यातील खळणा गावात जिल्हा निबंधक कार्यालयाच्या सावकारी पथकाने अवैध सावकारी करण्याऱ्यांच्या घरी झडतीची कार्यवाही २४ जानेवारी रोजी केली. या कार्यवाहीत आक्षेपार्ह ५३ कागदपत्रे,दस्तऐवज,कोरे धनादेश व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहे. ही कार्यवाही जिल्हा निबंधक यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. दि. २४ जानेवारी रोजी गैरअर्जदार अंकुश देवानंद घरडे व देवानंद अर्जुन घरडे दोन्ही रा. खळणा, ता. नेर, जि. यवतमाळ यांच्या राहत्या घरी सावकारी अधिनियमानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. अंकुश घरडे व देवानंद घरडे यांच्या विरुध्द पुणे येथील अर्जदार विनिता नंदकिशोर शहाडे यांचा तक्रार अर्ज विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती यांचेकडुन जिल्हा निबंधक, (सावकारी) यवतमाळ यांच्या कडे प्राप्त झालेला आहे. या तक्रार अर्जानुसार अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रुपये १ लाख 50 हजार चार टक्के दराने सावकारी मध्ये घेतली होती, त्याबद्दल गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडुन वाद शेताचे नाममात्र खरेदीखत करुन दिले होते. गैरअर्जदार यांची सावकारी रक्कम रुपये १ लाख 50 हजार व त्यावरील चार टक्के व्याज परत केल्यानंतर गैरअर्जदार वाद शेताचे खरेदी खत अर्जदार यांच्या नावाने पलटुन देण्याचे ठरले होते. परंतु गैरअर्जदार यांनी शेती पलटुन दिली नसल्यामुळे सदरील खरेदी खत रद्द करण्यात यावे. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी सावकारी पथकाने गैरअर्जदार अंकुश देवानंद घरडे व देवानंद अर्जुन घरडे यांचे राहते घरी झडती घेतली. या कारवाई दरम्यान गैरअर्जदार यांचे घरातून संशयास्पद कोरा चेक्क, कोरा स्टॅप पेपर, खरेदी खत नोंदी असलेल्या डायऱ्या व हिशोबाच्या चिठ्ठया असे एकुण ५३ कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. या कागदपत्राची पडताळणी करुन सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. ही कारवाई सावकारांचे जिल्हा निबंधक, तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांच्या नियोजनात सावकारी पथकातील पथक प्रमुख तथा सहाय्यक निबंधक बि. जी. जाधव, के.टी. खटारे, सहकार अधिकारी एम. एम. भगत, सहकार अधिकारी जी.पी.राठोड, एस.डी. सहकार अधिकारी श्रेणी-२, कळंब, चांदेकर, आर. डब्लु. टाके, आर.एन. नाईक, हनुमंत आठवले तसेच पोलीस प्रशासनातील के. आर. निन्सुरवाले, मनोज एस. गायकवाड, स्वाती सोळंके, रुपाली सयाम आणि पंच म्हणून तहसिल कार्यालयाचे एस. डी. राठोड, ए.एम. ठोकाडे हे सहभागी होते. ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी, तथा अध्यक्ष जिल्हा सनियंत्रण समिती आणि जिल्हा पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहकार विभाग, महसुल विभाग आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी यांनी पार पाडले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी