पीक नुकसानीच्या पूर्व सूचनांचे पंचनामे सुरू ; विमा कंपनीच्या पर्यवेक्षकाकडून पैशाची मागणी झाल्यास तक्रार करा - प्रमोद लहाळे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामातील पीक नुकसानीच्या पुर्व सूचना शेतकऱ्यांनी दाखल केल्या आहे. या पुर्वसुचनांचे विमा कंपनीकडून पंचनामे करण्यात येत आहे. पीक नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी विमा कंपनीच्या पर्यवेक्षकाकडून अडवणूक झाल्यास किंवा पैशाची मागणी झाल्यास विमा कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांक १८००१०२४०८८ यावर संपर्क करावे किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास लेखी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना योजनेअंतर्गत पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट इत्यादी कारणाने होणाऱ्या पीक नुकसानीच्या पुर्व सूचना ह्या ७२ तासाच्या आत विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी दाखल केल्या आहे. या पुर्वसुचनांचे विमा कंपनीकडून पंचनामे करण्यात येत असून बऱ्याच शेतकऱ्याकडून पीक विमा कंपनीच्या पर्यवेक्षकाकडून पंचनामे करण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून नुकसानीच्या सर्वेक्षण कामी शेतकऱ्यांची अडवणूक करुन पैशाची मागणी होत असल्याची बाब निदर्शानास येत आहे. त्यानुषंगाने नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या नुकसान पर्यवेक्षकाला पैसे देऊ नये तसेच कोणत्याही प्रलोभणास बळी पडु नये. नुकसान पर्यवेक्षकाकडून अडवणूक झाल्यास किंवा पैशाची मागणी झाल्यास विमा कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांक १८००१०२४०८८ यावर संपर्क करावे किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास लेखी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. ०००० --

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी