आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या अर्थसहाय्य योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन २५ जानेवारीपासून अर्ज स्वीकारले जाणार

पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत समाविष्ठ टिएसपी आणि ओटिएसपी क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी न्युक्लियस बजेटअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या लाभासाठी आदिवासी बांधवांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. प्रकल्पाच्यावतीने १०० टक्के अनुदानावर आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीगट, बियाणे व कीटकनाशक, तारकुंपण, व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजना राबविल्या जात आहेत. तसेच ८५ टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्यांना शेळीगट, बियाणे, तारकुंपण, व्यवसाय, वनपटेधारकांना बियाणे, शेती अवजारे, आदिवासी पुरुष व महिला बचत गटांना विटभटीसाठी अर्थसहाय्य करणे या योजना राबविल्या जात आहेत. यासह गट क मधील १०० टक्के अनुदानावर आदिवासी खेळाडूंना अर्थसहाय्य करणे, आदिवासी लाभार्थ्यांना शेतजमीन मोजण्यासाठी अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना अर्थसहाय्य, आणि वैद्यकिय व इंजिनिअरींग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य करणे या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छूकांना आपले अर्ज, आवेदनपत्र दि.25 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा येथे किंवा नजिकचे आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह तसेच शासकीय आश्रमशाळेत सादर करता येईल. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक खाते, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, शेतीविषयक योजनेसाठी सातबारा, खेळ साहित्यासाठी खेळाबाबतचे प्रमाणपत्र, स्वयंघोषणा प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समोरील झेरॉक्स सेंटर तसेच https://itdp-pandharkawada.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 07235-227436 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी