स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा उत्साहात नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजन

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयच्या येथील नेहरु युवा केंद्राव्दारे नुकताच स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा कॉलेज ऑफ मॅनेजमेन्ट अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक अमरीश मानकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पोलीस वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक अजीत राठोड, सेवा निवृत्त मुख्याध्यापक नितिन खर्चे, सेवा निवृत्त पोलीस उप अधिक्षक श्री बायस , कॉलेज ऑफ मॅनेजमेन्ट अॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य रितेश चांडक, नेहरु युवा केंद्राचे अनिल देंगे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरु युवा केंद्राचे अनिल देंगे यांनी केले. करुन युवकांना राष्ट्रीय युवा दिन व सप्ताहच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच कलागुणांना वाव देण्यासाठी नेहरु युवा केंद्र सातत्याने प्रयत्न करीत असून या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. नाशिक येथे संपन्न झालेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील युवकांना संबोधित केले असून यांचे लाईव्ह प्रसारण दाखविण्याची व्यवस्था कार्यक्रम करण्यात आली. याशिवाय रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचे तसेच रॅलीचे आयोजन करण्यात आले. मेरा भारत विकसित भारत २०२७ या विषयावर झालेल्या जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी योगेश्वरी किशोर राठोड हिची निवड करण्यात आली. तिने दिलेले भाषण आपणा समोर सादर करणार आहे. याप्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होवून युवकांसमोर आपला आदर्श निर्माण करावे अशी भावना तिने व्यक्त केली. उद्घाटनपर भाषण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक अमरीश मानकर यांनी केरुन युवकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कु योगेश्वरी राठोड हिने माझा भारत विकसित भारत या विषयावर भाषण युवकांसमोर सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नितिन खर्चे यांनी स्वामी विवेकनंद यांच्या जीवनाबाबत युवकांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अजीत राठोड यांनी युवकांना वाहतुकीच्या नियमाबाबत व नियम पाळून अपघात टाळण्याबाबत युवा पिढीने जागरुक राहण्याची नितांत गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य रितेश चांडक यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी योगेश पाटील यांनी केले. यावेळी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. व २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह मनोगत युवकांना दाखविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य रितेश चांडक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी योगेश पाटील, नेहरु युवा केंद्राचे अनिल देंगे व महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, अधिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी