जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आरोपीच्या अटकेबाबत कायदेविषयक मार्गदर्शन

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लोहारा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रि-अरेस्ट, अरेस्ट आणि रिमांड स्टेज" याबाबत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांचे मार्गदर्शनाखाली सोमवारी २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून सहायक लोकअभिरक्षक अजय दाणी होते. लोहारा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. सहायक लोकअभिरक्षक अजय दाणी यांनी अटक केलेल्या व्यक्तींना असलेल्या अधिकाराबाबत विस्तृत अशी माहिती दिली. पक्षकारांना अटकेपासून वाचविण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्याच्या हेतुने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिर्णयानुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला कायदेशिर मदत मिळणे आवश्यक असल्याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीला चौकशीसाठी का बोलावले, अटक का करण्यात आली तसेच अटकेबाबत घरच्या व्यक्तींना कळविणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल नहार यांनी फौजदारी प्रकिया संहिता कलम ४१ अ ते ४१ ड अन्वये अटक केलेल्या व्यक्तीच्या अधिकाराबाबत विस्तृत माहिती दिली. या कार्यकमाचे सूत्रसंचालन व आभार लोहारा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सोनाली राठोड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पक्षकार व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी