चर्मकार प्रवर्गातील 25 हजार युवक-युवती, महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षणाची संधी

लिडकॉम मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात चर्मकार प्रवर्गातील युवक युवती आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे तीन वर्षांत २५ हजार चर्मकारांना प्रशिक्षण मिळणार आहे. या करारावर लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्र प्रमुख तथा राज्य समन्वयक हेमंत वाघमारे यांनी स्वाक्षरी केली. या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया विपणन आणि ग्राहक सेवा यासह विविध विषयांचा समावेश असेल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षितांना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. या करारामुळे चर्मकार प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना आणि महिलांना उद्योजक बनण्यायी संधी मिळेल. या करारावेळी लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांचे आभार व्यक्त केले. चर्मकार प्रवर्गातील युवक युवतींनी आणि महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.गजभिये यांनी केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन ३ रा माळा दारव्हा रोड यवतमाळ येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी