इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाद्वारे गुरव समाजाचा सामाजिक व आर्थ‍िक विकासासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थ‍िक विकास महामंडळ स्थापित करण्यात आले. शासनाद्वारे वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक व आर्थ‍िक विकासासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थीक विकास महामंडळ स्थापित करण्यात आले. या दोन्ही महामंडळाद्वारे बीज भांडवल कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, वैयक्तिक थेट कर्ज याजेना, महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतवाता योजना, शैक्षणीक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य प्रशिक्षण विकास योजना राबविण्यात येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील गुरव व वीरशैव लिंगायत समाजातील बेरोजगारांनी व होतकरूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणी विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दक्षता भवनच्या मागे, दारव्हा रोड, यवतमाळ यांनी कळविले आहे. या कर्ज योजनांचे उद्देश, स्वरूप व पात्रतेचे निकष याची सविस्तर माहितीसाठी महामंडळाच्या वेबसाईट वेबसाईटवर अर्ज करावे. तसेच बीज भांडवल व थेट कर्ज योजनेबाबत जिल्हा कार्यालयात संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी