बाभुळगावात पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळावा

अकरा कंपन्या सहभागी होणार ; २१९३ पदांसाठी भरती होणार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभुळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आमदार, डॉ अशोक उईके, यांच्या राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये दि. १२ जानेवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभुळगांव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एकूण २१९३ रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यात पटले एज्युस्क्लि फाऊंडेशन, नागपूर, इफिमॅन सर्व्हिसेस, प्रा. लि. नागपूर, पिपल ट्री वेचर्स, अमरावती, क्रेडिट अॅक्सीस ग्रामिण लि. नागपूर, सारा स्पिन्टेक्स प्रा. लि. धामणगाव रोड, यवतमाळ, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक, यवतमाळ, मँक व्हेईकल, यवतमाळ, पेटीएम सर्व्हीस प्रा.लि., सायबरथॉन, नागपूर, क्लॅड मेटल प्रा.लि.छ. संभाजी नगर इत्यादी एकूण ११ नामांकीत कंपनी मार्फत रिक्तपदे प्राप्त झाले आहेत. या मेळाव्यामध्ये १० वी, १२ वी, आयटीआय, इंजिनिअरींग, पदवी, पदव्योत्तर, पदविका तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखती देवून लाभ घेता येणार आहे. या रोजगार मेळाव्यास उद्योजकाकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्तपदासाठी निवड करण्यात येणार असून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे, यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी