प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी सात दिवसांची अंतिम मुदत लाभार्थी शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरणा करण्याचे महाऊर्जाचे आवाहन

महाकृषी ऊर्जा अभियानाच्या पीएम कुसुम योजनेंतर्गत जिल्ह्यातील 513 लाभार्थी शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याचा संदेश दिलेला असूनही त्यांनी अद्याप लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी एमईडीए बेनिफीशिअरी अप्लिकेशन या ऑनलाईन अॅपव्दारे लाभार्थी हिस्सा सात दिवसांत भरणा करावा,असे आवाहन महाऊर्जाने केले आहे. या योजनेंतर्गत कुसुम ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त असलेल्या अर्जाची पडताळणी करुन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मुख्यालयाकडून लाभार्थी हिस्सा भरण्याचे संदेश वितरित केले जातात. या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील 513 लाभार्थी शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याचा संदेश दिलेला असूनही त्यांनी अद्याप लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. तसेच अशा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा, जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांचेकडून वेळोवेळी भ्रमणध्वनीव्दारे लाभार्थी हिस्सा भरणेबाबत कळविण्यात आलेले आहे. आता अशा लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा मुख्यालय, पुणे यांच्याकडून लाभार्थी हिस्सा भरणेबाबत करण्याकरीता सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. व लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या मुख्यालयामार्फत प्राप्त झालेल्या संदेशान्वये सात दिवसांच्या आत एमईडीए बेनिफीशीअरी अप्लिकेशन या ऑनलाईन अॅपद्वारे लाभार्थी हिस्सा भरणा करावा. तसेच लाभार्थी हिस्सा भरणा करतांना काही अडचणी आल्यास दूरध्वनी क्र. ०७२३२-२४११५० किंवा doyavatmal@mahaurja.com या ई-मेल आयडीवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी