जल जीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करा - डॉ पंकज आशिया

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची सभा जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील मंजूर पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीय करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले. जिल्ह्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी महसूल भवनात जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची सभा झाली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपविभागीय अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण, महावितरण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जल जीवन मिशनच्या योजनांचा देखील आढावा घेतला. यात फुलसावंगी, माळपठार, जवळा, शेंबाळपिंप्री आदी पाणी पुरवठा योजनांच्या प्रगतीची माहिती घेतली. या योजनांना गती द्यावी. जागेसंदर्भातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी केल्या. जिल्ह्यात जलजीवनच्या १५३९ पाणी पुरवठा योजना जल जीवन मिशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात एकूण १५३९ पाणी पुरवठा योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या खर्चाची अंदाजित रक्कम ९५६ कोटी आहे. सद्यस्थितीत १३२९ नळ पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू झालेली आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाकडून यावेळी देण्यात आली. शाळा, अंगणवाड्यांची नळ जोडणी पूर्ण
सन २०२२-२३ या वर्षात जिल्ह्यातील २७२५ शाळा आणि २७१२ अंगणवाड्यांची नळ जोडणी शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेने योजनेच्या प्रगती अहवालात देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी