पालकमंत्र्यांनी घेतली खनिज प्रतिष्ठान समितीची बैठक



यवतमाळ, दि. 8 : प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रातील विविध विकासकामांच्या प्रस्तांवाबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान प्रशासकीय परिषद समितीची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते.
खनीज विकास निधीतून मंजूर कामांना देण्यात आलेला निधी संबंधितांना देण्यात यावा, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्हा नियोजन समितीतून विविध विकास कामांना निधी दिला जातो. जिल्ह्याची गरज लक्षात घेता काही विकास कामे खनीज विकास निधीतून केली जातात. त्यासाठी संबंधित विभागांकडून प्रस्ताव येतात. या प्रस्तावावर कार्यवाही करून विकास कामांसाठी मिळालेला निधी खर्च होणे गरजेचे आहे. वणी आणि आर्णि येथे विद्युत विभागाने भुमिगत केबल टाकण्याचे नियोजन करावे. दिग्रस येथे राष्ट्रीय स्तरावरचे इनडोअर कबड्डी स्टेडीयमकरीता क्रीडा विभागाने प्रस्ताव तयार करावा. तसेच खनिज विकास निधीतून घेतलेल्या कामांची यादी खनीकर्म विभागाने स्थानिक आमदारांना पाठवावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
यावेळी त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रातील भौतिक पायाभूत सुविधा, पाणी पुरवठ्याच्या योजना, पर्यावरण संवर्धन व प्रदुषण नियंत्रण उपाययोजना, आरोग्यासंदर्भात यंत्रसामुग्री, स्वच्छता, शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित कामे, उर्जा व पाणलोटक्षेत्र विकास, जलसंपदा आदींचा आढावा घेतला.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी