वृक्ष लागवड हे ईश्वरी कार्य - आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके



            यवतमाळ, दि. 13 : पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे.  वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले तर  मनुष्याला चांगले आरोग्य प्रदान होईल आणि व्याधींपासून मुक्ती मिळेल. शासनाने सुरू केलेली  वृक्ष लागवडीची  योजना सर्वांनी प्रामाणिकपणे राबवावी. वृक्ष लागवड हे  ईश्वरी कार्य आहे,  असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले.
पांढरकवडा वन विभाग अंतर्गत तेजनी येथे आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  मंचावर मुख्य वनसंरक्षक र. ना. वानखडे, उपवनसंरक्षक के. अभर्णा, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, जि.प. सदस्य चित्तरंजन कोल्हे, राळेगाव नगर पंचायतचे बाळासाहेब कविश्वर, पं.स.सदस्य प्रशांत तायडे आदी उपस्थित होते.
आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ. उईके म्हणाले, येत्या काळात आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात येईल. वन विभागाला वृक्ष लागवडीसाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.  
कार्यक्रमाला संजय काकडे, बबनराव भोंगारे, डॉ.अक्षय जव्हेरी,गजाजन लढी, डॉ.कुणाल भोयर, संदीप तेलंगे, मारोती सलाम, शरदानंद जयस्वाल, विशाल येनोरकर, रणजित ठाकूर, राजेश शर्मा यांच्यासह ग्रामस्थ आणि वन कर्मचारी  उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी