आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला व्हीसीद्वारे आढावा



यवतमाळ, दि. 24 : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मंत्रालयातून व्हिसीद्वारे आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. यात 16 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणारी सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती जिल्हा परिषदेने तात्काळ वाटप करावी. या शिष्यवृत्तीचे ज्या जिल्ह्यात वाटप कमी झाले आहे, त्यांनी आपली गती वाढवून विद्यार्थ्यांना लाभ द्यावा. आश्रमशाळांमध्ये लैंगिक अत्याचार घडू नये, यासाठी महिला अधिका-यांनी सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये विद्यार्थीनींसोबत संवाद साधून त्यांची तपासणी करावी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधा पूर्णपणे मिळतील याबाबत जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिका-यांनी खात्री करावी. आश्रमशाळांना जोडणारे रस्ते, विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आदी बाबी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच अधिक्षक, अधिक्षिका, वसतीगृहाचे गृहपाल यांनी मुख्यालयी मुक्कामी रहावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
यासर्व बाबींची पुर्तता झाली की नाही याचा आढावा ऑगस्टअखेर मुख्य सचिवांच्या सोबत घेण्यात येईल. त्यामुळे सर्व जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिका-यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आदेश त्यांनी दिले. यवतमाळ येथील व्हीसीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पुसद आणि पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी