किटकनाशक फवारणी करणा-यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम





v सिंजेंटा कंपनीने लाँच केला ‘आय-सेफ’ कार्यक्रम
यवतमाळ, दि. 1 : किटकनाशक फवारणी करणा-या शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि सिंजेंटा इंडिया कंपनीतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. इनोवेटिव्ह हेल्थ अँड सेफ्टी प्रोग्रॅम म्हणजेच आय-सेफ अंतर्गत स्प्रे-मॅन उद्योजकासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांचे आरोग्य आणि सुरक्षेविषयी जागृत व शिक्षित करण्यासंदर्भात अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिनाचे औचित्य साधून सिंजेंटा इंडियाने आय-सेफ या कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, सिंजेंटाचे डॉ. के.सी.रवी आदी उपस्थित होते.
यावेळी जलज शर्मा म्हणाले, ही संकल्पना यवतमाळ येथील ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्यादृष्टीने महत्वाची आहे. सोबतच कृषी क्षेत्रातसुध्दा प्रगती होईल. यामुळे कृषी रसायनाचा दुरुपयोग टळेल व सुरक्षेबाबत सुधारणा होईल. सिंजेंटा डॉ. के. सी. रवी म्हणाले  महाराष्ट्र कृषी विभाग आणि यवतमाळ जिल्हा प्रशासन यासाठी आम्हाला सहकार्य लाभणं, हे आमच्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. या माध्यमातून कृषी क्षेत्रात आता जपली जाईल.
मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षित शेतकऱ्यांना स्प्रे पंप आणि सुरक्षा उपकरण देण्यात आले. तसेच सिंजेंटा वोक्हार्ट मोबाईल हेल्थ क्लिनिक ला झंडी दाखवून रवाना केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.  
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी