डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते कामगारांना सुरक्षा किटचे वाटप





यवतमाळ, दि. 28 : पांढरकवडा तालुक्यातील उमरी ग्रामपंचायत कार्यालयात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने आयोजित मेळाव्यात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते कामगारांना बांधकाम किटचे वाटप करण्यात आले. यावेळी केळापूरचे तहसीलदार सुरेश कवाळे, बांधकाम मंडळाचे पी. एन. कांबळे, शंकर अमृतवार, उमरीचे सरपंच वसंत राठोड, महादेव ठाकरे, अक्कलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
इमारत व इतर कामगारांना सुरक्षा किटचा लाभ मिळावा, या उद्देशाने राळेगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावात कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या कामगारांना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सुरक्षा किटचा लाभ मिळावा म्हणून कामगारांनी उमरीच्या ग्रामपंचायतमध्ये मोठी गर्दी केली होती. यावेळी  जवळपास 500 कामगारांना किटचे वाटप करण्यात आले।
 परिसरात सकाळी पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असतांना मोठ्या प्रमाणावर येथे कामगार बांधव उपस्थित होते. या कामगारांशी डॉ. उईके यांनी त्यांच्या विविध समस्या वर चर्चा केली. एवढेच नाही तर ज्या कामगारांना नोंदणीसाठी अडचणी येत होत्या त्यांना स्वतः मार्गदर्शन करून त्यांची ऑनलाइन नोंदणी करून दिली. त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी