पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ‘योजना आपल्या दारी’ उपक्रम



v सुवर्ण जयंती  महाराजस्व अभियानांतर्गत विविध गावांमध्ये आयोजन
यवतमाळ, दि. 27 : शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचाव्यात, या योजनांचा त्यांना लाभ घेता यावा व त्यांचे जीवनमान उंचवावे, या उद्देशाने जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या पुढाकाराने सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत ‘ योजना आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रम विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजनांची प्रकरणे स्वीकारणे, अन्नधान्य सुरक्षेच्या सर्वोच्च प्राधान्य गटामध्ये समाविष्ट करण्याकरीता अर्ज स्वीकारणे, जीर्ण झालेले रेशनकार्ड नवीन करून देणे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित असणा-या लाभार्थ्यांची माहिती संकलीत करणे, नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज स्वीकारणे आदींचा समावेश आहे.
अकोला बाजार येथे झालेल्या कार्यक्रमात 42 दुय्यम रेशन कार्ड, सात नवीन रेशन कार्ड व 12 व्यक्तिंची नावे कमी करणे अथवा वाढविणे तसेच निराधार / श्रावणबाळ योजनेची 6 प्रकरणे स्वीकारण्यात आली. सावरगड येथे 17 दुय्यम रेशन कार्ड, 4 नवीन रेशनकार्ड व 3 निराधार / श्रावणबाळ योजनेची तर कापरा (मी) येथे झालेल्या योजना आपल्या दारी उपक्रमात 22 पारधी, कोलाम कुटुंबांना अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून प्रमाणपत्र देण्यात आले.
दि. 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अर्जुना ग्रामपंचायत कार्यालय येथे, दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता येळाबारा ग्रामपंचायत कार्यालय, दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तळेगाव ग्रामपंचायत कार्यालय, दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता यवतमाळ येथील मंडळ अधिकारी कार्यालय, दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हिवरी ग्रामपंचायत कार्यालय आणि दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कोळंबी ग्रामपंचायत कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी