महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत आदर्श ग्राम स्पर्धा


v 20 जूलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रित
यवतमाळ, दि. 8 : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासीबहूल क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी शासनाच्या विविध विभागांच्यावतीने अनेक नाविण्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहे. यात पाणी, रस्ते, कृषी, आरोग्य, पोषण, संस्थांची बांधकामे, रोजगार, शैक्षणिक सुविधा, स्वच्छतेच्या सुविधा अशा पायाभुत सुविधांचा समावेश आहे.
आदर्श ग्राम निर्मितीसाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनची स्थापना करण्यात आली असून राज्यातील 1 हजार गावे आदर्श ग्राम म्हणून विकसित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देवून आदर्श ग्राम निर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अभियानात निवड झालेल्या पहिल्या टप्प्यातील 11 जिल्ह्यांसाठी लागू असणार आहे.  यात नंदूरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राज्यातील 1 हजार गावांचे परिवर्तन करणे हा प्रमुख उद्देश असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या 11 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आदर्श ग्राम म्हणून घोषित करणे. यासाठी समाजातील सर्व घटक जसे महिला, पुरुष, युवक,युवती, शेतकरी, शेतमजूर तसेच शासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, लिड डेव्हलपमेंट पार्टनर आदींचा सहभाग घेणे. आदर्श ग्राम निर्मिती अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची लोकांमध्ये जनजागृती करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
व्हिएसटीएफ ग्रामपंचायतींनी नमुद निकषानुसार स्व – मुल्यांकन करून गुणांकन देणे, स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायती स्व- मुल्यांकन करून त्यांचे प्रस्ताव संबंधीत गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयास पाठवतील. प्राप्त प्रस्तावांपैकी अधिक गुण प्राप्‍त पहिल्या 3 ग्रामपंचायतींची जिल्हा तपासणी समिती तपासणी करून त्यांना गुणांकन देतील.
प्रत्येक जिल्ह्यातून आदर्श ग्राम म्हणून जास्तीत जास्त गुणांकन मिळालेल्या 3 ग्रामपंचायतींचा प्रस्ताव राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. राज्य स्तरावरून गुणांकन मिळालेल्या ग्रामपंचायतींची राज्यस्तरावरून तपासणी करण्यात येईल. राज्यस्तरावरून सदर ग्रामपंचायतींचे अंतीम गुणांकन करून, संबंधीत ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर समारंभपूर्वक रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. आदर्श ग्राम निर्मितीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपरिवर्तक, जिल्हा समन्वयक, लिड डेव्हलपमेंट पार्टनर प्रतिनिधी यांनासुध्दा सन्मानित करण्यात येईल.
स्पर्धेचा कालावधी व कृती कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 10 जुलै ते 20 जुलै 2019 व्हिएसटीएफ ग्रामपंचायतींनी आदर्श ग्रामसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा. 22 जुलै ते 31 जुलै 2019 समितीने ग्रामपंचायतींची पाहणी करून, वस्तुस्थितीवर आधारीत मुल्यांकन करणे व गुणांकन देणे. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2019 जिल्हा अभियान परिषदेने उत्कृष्ट 3 ग्रामपंचायतींचा छायाचित्रांसह प्रस्ताव राज्यस्तरावर सादर करावा. 10 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2019 राज्यस्तरावरून ग्रामपंचायतींची तपासणी व मुल्यांकन, सप्टेंबर पहिला आठवडा राज्यस्तरावरून आदर्श गावांना बक्षिस देण्यात येईल.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी