एका मृत्युसह जिल्ह्यात 63 नव्याने पॉझेटिव्ह

 


Ø 48 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 13 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 63 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये केळापूर तालुक्यातील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 48 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 13) एकूण 697 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 63 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 634 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 444 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13373 झाली आहे. 24 तासात 48 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12517 आहे. तर जिल्ह्यात एकूण 412 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 130534 नमुने पाठविले असून यापैकी 130020 प्राप्त तर 514 अप्राप्त आहेत. तसेच 116647 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी