अंगणवाडी, शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधुनिकीकरणावर भर देणार – पालकमंत्री संजय राठोड

 



            यवतमाळ, दि. 29 : आंगणवाड़ी आणि शाळा हे दोन्ही विषय मुलांच्या भविष्याशी निगडित आहे. ग्रामीण भागातील या दोन्ही बाबी चांगल्या स्थितित असल्या की मूलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातून नागरिकांना आरोग्यच्या उत्तम सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आंगनवाड़ी, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधुनिकीकरणा वर भर देणार, असे राज्याचे वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. विश्राम गृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

            जिल्ह्यातील शाळा सूंदर व आकर्षक झाल्या पाहिजे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, रंगरंगोटी करून शाळा आकषर्क करा. सुसज्ज अंगणवाडी उभारणेतसेच ज्या ठिकाणी अंगणवाडी नाही अशा व मोडकळीस आलेल्या जवळपास 500 अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करणार लवकरच करण्यात येईल. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लहान मुलांच्या दृष्टीने आकर्षक इंटेरीअर तसेच कमी उंचीवर खिडक्या केल्यास मुलांना आवड निर्माण होईल, असे टाईप प्लॉन बनविणे. याशिवाय जिल्ह्यातील शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण करून सुसज्ज बनविणे, आदी गोष्टींना प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, सभापती विजय खडसे, श्रीधर मोहोड, राम देवसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, नियोजन अधिकारी वाडेकर आदि उपस्थित होते.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी