2021 – 22 मध्ये जिल्ह्याला 2397 कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट

 


Ø नाबार्डची 4505.08 कोटी संभाव्य वार्षिक क्रेडिट योजना

यवतमाळ, दि. 8 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) द्वारे संभाव्य वार्षिक क्रेडिट योजना (पी.एल.पी.) 4505.08 कोटी रुपयांची आहे. यात जिल्ह्याला 2021-22 या वर्षात 2397.39 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट  आहे.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते वार्षिक क्रेडीट योजनेचे विमोचन करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दिपक पेन्दाम, अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, जिल्हा सहकारी निबंधक रमेश कटके, वार्षिक क्रेडिट योजना 2021-22 (पी.एल.पी.) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी उत्पादनाचे संकलन वर आधारीत आहे.

नाबार्डने तयार केलेल्या पी.एल.पी. वर बँकासाठी वार्षिक क्रेडिट योजना व वास्तववादी धोरणात्मक योजना बनविले जातात. पी.एल.पी. अंदाजानुसार तांत्रिक व्यवहार्यता, पायाभूत सुविधा संसाधने, पीककर्ज, जीएलसी प्रवाह व इतर विकास निर्देशकांत उपलब्धता वर आधारीत आहेत. दरवर्षी संभाव्य ऋण आराखडा वर आधारीत जिल्ह्यातील सर्व बँकेचे वार्षिक लक्षांश निश्चित होत असतात. नाबार्डच्या संभाव्य ऋण आराखड्यात पिक कर्ज वाटपासाठी 2 हजार 397 कोटी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. यंदा यात 31 कोटीची वाढ करण्यात आली आहे.

नाबार्ड संभाव्य कर्ज आराखड्यानूसार वर्ष 2021-22 साठी 2 हजार 397 कोटी 39 लाख रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. तसेच शेतीमधील मुदत कर्जासाठी 643 कोटी 57 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. पीक कर्जासह कृषी पायाभूत सुविधा, सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एम.एस.एम.ई.) शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज अक्षय ऊर्जा इत्यादी प्राथमिक क्षेत्रातील सर्व घटकाकरीता यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण 4 हजार 505 कोटी 8 लाख रुपयांचा कर्ज आराखडा तयार करण्यात आला आहे.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी